पनवेलच्या माजी नगराध्यक्ष आणि उद्योजक जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनीवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:58 IST2017-09-23T04:58:46+5:302017-09-23T04:58:48+5:30
पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि उद्योजक जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनींवर शुक्रवारी आयकर विभागाचे छापे पडले. दिल्ली आणि मुंबई आयकरच्या विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या या छाप्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पनवेलच्या माजी नगराध्यक्ष आणि उद्योजक जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनीवर छापे
मुंबई / पनवेल : पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि उद्योजक जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनींवर शुक्रवारी आयकर विभागाचे छापे पडले. दिल्ली आणि मुंबई आयकरच्या विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या या छाप्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
म्हात्रे हे शेकापशी निगडित असून त्यांचे जे. एम. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मार्फत नवी मुंबई, तसेच राज्यभरात विविध ठिकाणी कामे सुरु आहेत. नोट बंदीच्या काळात झालेल्या विविध व्यवहारांमुळे आयकर विभागाच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.