पनवेल ओपन बॅडमिंटन आजपासून रंगणार
By Admin | Updated: April 8, 2017 04:52 IST2017-04-08T04:52:36+5:302017-04-08T04:52:36+5:30
बावन बंगलो जिमखाना येथे शनिवारपासून पनवेल ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची चुरस रंगणार आहे

पनवेल ओपन बॅडमिंटन आजपासून रंगणार
पनवेल : येथील बावन बंगलो जिमखाना येथे शनिवारपासून पनवेल ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची चुरस रंगणार आहे. या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरुष दुहेरी स्पर्धेचे उद्घाटन ८ एप्रिलला सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन व बॅडमिंटन आॅर्गनायझेशन आॅफ रायगड यांच्या मान्यतेने आणि पनवेल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने होत असलेल्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला, राष्ट्रीय खेळाडू इक्बाल मैदर्गी व
दीप्ती पुरोहित-परांजपे उपस्थित राहाणार आहेत. उद्घाटनानंतर सकाळी १० वाजल्यापासून सामने सुरू होतील, तर रविवारी संध्याकाळी ७ वाजता विजेतेपदाची लढत होईल. (प्रतिनिधी)