शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल : आश्रमशाळेच्या वसतिगृहात स्लॅब कोसळून आठ विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 05:01 IST

पनवेल तालुक्यातील चिखले गावात असलेल्या अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांच्या अंगावर बुधवारी पहाटे अचानक स्लॅब कोसळला.

पनवेल : पनवेल तालुक्यातील चिखले गावात असलेल्या अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांच्या अंगावर बुधवारी पहाटे अचानक स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत आठ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना तातडीने कामोठा येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली.चिखले गावातील या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतची ५४४ मुले-मुली शिक्षण घेतात. बुधवारी रात्री मनोरंजन हॉलमध्ये ४५ मुले झोपली होती. पहाटे दीडच्या सुमारास अचानकपणे छताचे प्लॅस्टर पडल्याने आठ मुले जखमी झाली. सोनू निरगुडा (१३, सातवी), दिनेश आव्हाडे (१५, सातवी), युवराज मदे (१०, पाचवी), भुमराज चौधरी (१२, सातवी), मोहन मदे (१३, सातवी), मयूर खंडवी (१६, दहावी), राजवीर मदे (७, पहिली), विलास उघडे (१४, सातवी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पाठीला, डोक्याला, हाताला, पायाला जखमा झाल्या आहेत. यामध्ये मयूर खंडवीच्या हाताला गंभीर दुखापत आहे.या घटनेची माहिती मिळताच पालकांनी वसतिगृहात धाव घेतली व तातडीने एमजीएम गाठले. याची पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद केली असून, वपोनि मालोजी शिंदे यांनी आश्रमशाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. येथील वर्गाच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वीच पत्र दिल्याची माहिती येथील शाळेकडून मिळाली आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटल