पनवेल-चिपळूण डेमू दक्षिणेकडे रवाना होणार
By Admin | Updated: October 9, 2015 00:58 IST2015-10-09T00:58:30+5:302015-10-09T00:58:30+5:30
गणेशोत्सवादरम्यान सुरू करण्यात आलेली पनवेल-चिपळूण डेमू विशेष ट्रेन दक्षिणेकडे रवाना करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या ट्रेनला अल्प प्रतिसाद मिळाल्यानेच हा निर्णय

पनवेल-चिपळूण डेमू दक्षिणेकडे रवाना होणार
मुंबई : गणेशोत्सवादरम्यान सुरू करण्यात आलेली पनवेल-चिपळूण डेमू विशेष ट्रेन दक्षिणेकडे रवाना करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या ट्रेनला अल्प प्रतिसाद मिळाल्यानेच हा निर्णय घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही ट्रेन पनवेल-चिपळूण मार्गावर नियमित व्हावी, अशी मागणी प्रवाशांची होती.
गणेशोत्सवात कोकणासाठी मध्य रेल्वेकडून २६0पेक्षा जास्त ट्रेन सोडण्यात आल्या. स्वस्त आणि सुकर प्रवासासाठी पनवेल-चिपळूण डेमू ट्रेनही सुरू करण्यात आली. अनारक्षित ट्रेन असल्यामुळे त्याचे भाडे ५0 रुपये आकारण्यात आले. एक एसी डबाही जोडला. पनवेलमध्ये ही ट्रेन रात्री साडे दहाच्या सुमारास येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. मुंबई किंवा ठाण्याला येण्यासाठी पनवेलहून रात्री लोकल नसल्याने या ट्रेनने येणे प्रवासी टाळत होते, असे सांगण्यात आले. गणेशोत्सवात सुरुवातीच्या दोन ते तीन दिवसांत या डेमूला प्रतिसाद मिळाल्यानंतर मात्र त्यानंतर फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.