पनवेल-चिपळूण डेमू प्रवास आजपासून

By Admin | Updated: September 4, 2015 01:09 IST2015-09-04T01:09:36+5:302015-09-04T01:09:36+5:30

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी पनवेल-चिपळूण डेमू अनारक्षित पहिली ट्रेन ४ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार आहे

Panvel-Chiplun DEMU journey from today | पनवेल-चिपळूण डेमू प्रवास आजपासून

पनवेल-चिपळूण डेमू प्रवास आजपासून

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी पनवेल-चिपळूण डेमू अनारक्षित पहिली ट्रेन ४ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार आहे. या प्रवासासाठी पनवेल-चिपळूणसाठी ५0 रुपये मोजावे लागतील. या ट्रेनला एक एसी डबाही जोडण्यात येणार असून, त्याचे तिकीट ३९५ रुपये असेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. एसी डब्यातून प्रवास करण्यासाठी आरक्षण करता येणार आहे.
मध्य रेल्वेने पहिल्यांदाच पनवेल-चिपळूण अनारक्षित डेमू ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून, ही ट्रेन ४ सप्टेंबरपासून धावणार आहे. या ट्रेनच्या ४0 फेऱ्या होणार आहेत. एसी प्रवासासाठी पनवेल ते खेडसाठी ३४५ रुपये, पेण-चिपळूसाठी २२१ रुपये आणि पेण-खेडसाठी १८0 रुपये भाडे आकारण्यात येईल.
ट्रेन नंबर 0११0७ पनवेलहून ११.१0 वाजता सुटून चिपळूण येथे त्याच दिवशी
१६.00 वाजता पोहोचेल. तर ट्रेन नंबर 0११0८ चिपळूण येथून १७.३0 वाजता सुटून पनवेल येथे २२.३0 वाजता पोहोचेल.

मध्य रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या पाच गणपती विशेष ट्रेनला प्रत्येकी दोन जनरल सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत. ट्रेन नंबर 0१00१ सीएसटी-मडगाव ११ ते २९ सप्टेंबरपर्यंत आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. या ट्रेनला एक जनरल सेकंड क्लास डबा ठाण्यापासून तर दुसरा डबा पनवेलपासून जोडण्यात येईल.
ट्रेन नंबर 0१0३३ सीएसटी-मडगाव (फक्त गुरुवारी), ट्रेन नंबर 0१0९५ दादर-सावंतवाडी विशेष ट्रेन (रविवार, मंगळवार, शुक्रवारी), 0१00५ एलटीटी-मडगाव ट्रेन (गुरुवार वगळता अन्य दिवशी), 0१0२५ एलटीटी-करमाळी विशेष ट्रेनलाही (प्रत्येक दिवशी) प्रत्येकी दोन डबे जोडताना ते ठाणे आणि पनवेलपासून जोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
ट्रेन नंबर 0१0३३ सप्टेंबर १0 ते १ आॅक्टोबर, ट्रेन नंबर 0१0९५ सप्टेंबर १0 ते २९ सप्टेंबरपर्यंत, ट्रेन नंबर 0१00५ सप्टेंबर ८ ते २८ सप्टेंबरपर्यंत आणि ट्रेन नंबर 0१0२५ सप्टेंबर ८ ते २८ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.

या ट्रेनच्या ४0 फेऱ्या होणार असून, त्या पुढीलप्रमाणे असतील
ट्रेन नंबर 0११0७ आणि ट्रेन नंबर 0११0८ सप्टेंबरच्या ४, ५, ६, ८, ९, ११, १२, १३, १५, १६, १७, १९, २0, २१, २३, २४, २६, २७, २९, ३0 तारखेला धावेल.

पनवेल-चिपळूण अनारक्षित ट्रेनचे थांबे
पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे, वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड आणि अजनी.
एसी डब्यांतील तिकीट आरक्षण त्वरित सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Panvel-Chiplun DEMU journey from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.