पॅन्ट्री, वायफाय आणि बरेच काही...

By Admin | Updated: May 16, 2015 03:19 IST2015-05-16T03:19:47+5:302015-05-16T03:19:47+5:30

अनेक कामानिमित्त मुंबई ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाकडून लवकरच आलिशान असा प्रवास घडविला जाणार आहे.

Pantry, WiFi, and more ... | पॅन्ट्री, वायफाय आणि बरेच काही...

पॅन्ट्री, वायफाय आणि बरेच काही...

मुंबई : अनेक कामानिमित्त मुंबई ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाकडून लवकरच आलिशान असा प्रवास घडविला जाणार आहे. एसटीच्या ताफ्यात दीड कोटी किमतीच्या दोन बसेस दाखल होणार असून, या बसेस मुंबई एअरपोर्ट ते पुणे मार्गावर चालविण्याचा निर्णय झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बसमध्ये प्रवाशांना प्रवासातच चहा-नाश्त्याची सोय करून देण्यासाठी पॅन्ट्री असणार आहे. तसेच वायफाय आणि अन्य सोयी-सुविधाही बसमध्ये उपलब्ध केल्या जाणार असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले.
एसटी महामंडळाने सध्या आपल्या ताफ्यातील ११0 एसी बसपैकी ७0 बस नादुरुस्ती आणि सातत्याने होणारे बिघाड यामुळे त्या बाजूला काढण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी ३५ स्वत:च्या मालकीच्या आणि ३५ भाड्यावर एसी बस घेतल्या जाणार होत्या. मात्र हा प्रस्ताव बाजूला ठेवत ७0 बसेस स्वत:च्या मालकीच्या घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ३५ व्होल्वो आणि ३५ स्कॅनिया कंपनीच्या बस विकत घेतल्या. यातील १० बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, १५ बस महिनाभरात येतील. तर उर्वरित बस येत्या तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या ताफ्यात तब्बल दीड कोटी किमतीच्या दोन स्कॅनिया कंपनीच्या बस असून, त्या मुंबई एअरपोर्ट ते पुणे या मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
महामंडळाने या मार्गावरून खासगी टॅक्सी आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एक सर्व्हे केला. या मार्गावरून खासगी टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता यातील तब्बल ६0 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी एसटीकडे खेचण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. त्यासाठी दीड कोटीच्या बस चालविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. खासगी टॅक्सीचे भाडे हे जवळपास १000 ते १२00पेक्षा अधिक असते. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भाडे जवळपास एक हजार रुपये ठेवण्याचा विचार करीत असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजख खंदारे यांनी सांगितले. या बसमध्ये प्रवाशांना चहा, कॉफी, नाश्ता, पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एक पॅन्ट्रीही उपलब्ध केली जाणार आहे. ही सेवा पहिल्यांदाच देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक आसनाच्या मागे एक टीव्हीदेखील बसविण्यात येणार असून, वायफायसारखी सुविधाही उपलब्ध केली जाणार असल्याचे खंदारे म्हणाले.

Web Title: Pantry, WiFi, and more ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.