पानसरे हत्या प्रकरण - पोलिसांच्या विरोधातील अवमान याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 18:57 IST2016-11-16T18:57:40+5:302016-11-16T18:57:40+5:30
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याला भेटू न दिल्याप्रकरणी आरोपीच्या वकिलांनी पोलिसांच्या विरोधात दाखल केलेली

पानसरे हत्या प्रकरण - पोलिसांच्या विरोधातील अवमान याचिका फेटाळली
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याला भेटू न दिल्याप्रकरणी आरोपीच्या वकिलांनी पोलिसांच्या विरोधात दाखल केलेली अवमान याचिका सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी बुधवारी फेटाळून लावली.
डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडे याला पानसरे हत्येप्रकरणी ह्यएसआयटीह्णने अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीच्या चौकशीमध्ये महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. डॉ. तावडे ह्यएसआयटीह्णच्या ताब्यात असताना अॅड. समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांना त्याची भेट घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती; परंतु पोलिसांनी या दोघांनाही भेट नाकारल्याने त्यांनी त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी हरकत घेते ४ सप्टेंबरला तावडे याला पोलिसांचे विशेष पथक तपासासाठी पनवेलला घेऊन गेले होते. त्याची पूर्व सूचना आरोपीच्या वकिलांना दिली होती. त्यानंतर दि. १६ सप्टेंबरपर्यंत तावडेची वकिलांना भेट दिली आहे.
आम्ही कोणत्याही आदेशाचा भंग केला नसल्याचे सांगितले होते. तसेच वृत्तपत्रांमध्ये तावडेचे फोटो प्रसिद्ध करण्यासाठी पोलिसांनी संगनमत करून आरोपीला झळकाविण्याचा प्रयत्न केला होता, अशी आरोपीची याचिकाही दाखल केली होती. त्यावर अॅड. बुधले यांनी वृत्तपत्रात फोटो छापून आले, त्याच्याशी आमचा काहीही संबध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजंूचे म्हणणे ऐकून न्यायालयाने बुधवारी अंतिम निकाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार झालेल्या सुनावणीमध्ये आरोपींच्या दोन्हीही याचिका न्यायाधीश पाटील यांनी फेटाळून लावल्या.