पंकजा मुंडे यांचे शक्तिप्रदर्शन
By Admin | Updated: July 1, 2015 02:07 IST2015-07-01T02:07:08+5:302015-07-01T02:07:08+5:30
महिला व बालकल्याण विभागातील खरेदीमुळे वादग्रस्त ठरलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांचे सोमवारी मध्यरात्री लंडनहून मुंबईत आगमन झाले.

पंकजा मुंडे यांचे शक्तिप्रदर्शन
मुंबई : महिला व बालकल्याण विभागातील खरेदीमुळे वादग्रस्त ठरलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांचे सोमवारी मध्यरात्री लंडनहून मुंबईत आगमन झाले. या वेळी त्यांचे शेकडो समर्थक विमानतळावर हजर होते. त्यांनी पंकजा यांच्या समर्थनार्थ तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देत शक्तिप्रदर्शन केले. बुधवारी दुपारी पंकजा या पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देणार आहेत. मुंडे यांचे समर्थक आक्रमकपणे ते घोषणा देत होते. यामुळे विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.