नाराजीच्या टिवट नंतर पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्टवरुन सारवासारव
By Admin | Updated: July 10, 2016 23:32 IST2016-07-10T23:32:31+5:302016-07-10T23:32:47+5:30
कोणीही माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी मला न पटणा-या गोष्टी करू नये. कोणत्याही व्यक्तीचा अवमान होईल असे कृत्य करू नये. कायदा व सुव्यवस्था राखावी. असे आव्हाहन पंकजा यांनी केले.

नाराजीच्या टिवट नंतर पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्टवरुन सारवासारव
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० : खातेवाटपामध्ये जलसंधारण आणि रोजगार हमी ही दोन महत्वाची खाती काढून घेतल्याची नाराजी पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे टि्वटरवरुन व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही लगेचच टि्वटरवरुन उत्तर दिले आहे. पण, जलसंधारण व रोजगार हमी योजनेची खाती काढून घेतल्याच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा युवक भाजपाचे कार्यकर्ते व मुंडे समर्थकांनी जाळला. आणि आपला रोष व्यक्त केला.
यानंतर माध्यमात फडणवीस-मुंडे यांच्याबददल चर्चेला उदान आले. आज रात्री उशीरा पंकाजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत कार्यकर्त्यास शांत राहण्याची विनंती केली. कोणीही माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी मला न पटणा-या गोष्टी करू नये. कोणत्याही व्यक्तीचा अवमान होईल असे कृत्य करू नये. कायदा व सुव्यवस्था राखावी. असे आव्हाहन पंकजा यांनी केले.
त्याचप्रमाणे , सर्वच नविन मंत्री अभिनंदनास पात्र आहेत. माझे निकटवर्तीय राम शिंदे व जयकुमार रावल यांना माझ्याकडील खाती दिली गेली, याचा मला आनंद आहे. त्यांना संधी मिळाली तर सहकारी म्हणून अभिमानच वाटला पाहिजे. नाराजीचा विषयच कुठे??
त्या दोघांना शुभेच्छा!!! त्यांचं मनोबल वाढेल असचं सहकार्य त्यांना झालं पाहिजे आणि मी ते करणारच असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट खालीलप्रमाणे आहे.