पंकजा मुंडे यांच्या ङोड सुरक्षेस टाळाटाळ

By Admin | Updated: July 8, 2014 01:34 IST2014-07-08T01:34:05+5:302014-07-08T01:34:05+5:30

स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आ. पंकजा मुंडे चालवित आहेत. त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो, यांची चिंता सामान्यांना आहे. त्यामुळे त्यांना ‘ङोड’ सुरक्षेची गरज आहे.

Pankaja Munde's high security escapes | पंकजा मुंडे यांच्या ङोड सुरक्षेस टाळाटाळ

पंकजा मुंडे यांच्या ङोड सुरक्षेस टाळाटाळ

बीड :  स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आ. पंकजा मुंडे चालवित आहेत.  त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो, यांची चिंता सामान्यांना आहे. त्यामुळे त्यांना ‘ङोड’ सुरक्षेची गरज आहे. गृहमंत्र्यांच्या सूचनेनंतरही पंकजा यांना ङोड सुरक्षा देण्यास टाळाटाळ सुरू असल्याचा आरोप बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. सुरक्षा न दिल्यास 15 जुलैपासून गृहमंत्र्यांना घराबाहेर पडू न देण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
गोपीनाथ मुंडे यांचा घातपात झाला असेल तर तेच लोक आता मुंडे यांचा वारसा चालविणा:या पंकजा यांच्यावरही सूड उगवू शकतात. यासाठी त्यांना ङोड सुरक्षा देण्याची मागणी आपण गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली असून पंकजा यांना सुरक्षेची आवश्यकता असल्याचे या वेळी गृहमंत्र्यांनीही मान्य केल्याचे पोटभरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Pankaja Munde's high security escapes