वैद्यनाथच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड
By Admin | Updated: May 12, 2015 01:05 IST2015-05-12T01:05:54+5:302015-05-12T01:05:54+5:30
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची तर उपाध्यक्षपदी नामदेवराव आघाव यांची सोमवारी

वैद्यनाथच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड
परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची तर उपाध्यक्षपदी नामदेवराव आघाव यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत पंकजा यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथ मुंडे पॅनलचे सर्व २० उमेदवार निवडून आले होते. अध्यक्षपदासाठी पंकजा यांचे नाव संचालक आर. टी. देशमुख यांनी तर आघाव यांचे नाव संचालक फुलचंदराव कराड यांनी सुचविले.