बीड जिल्हा परिषदेत पंकजा मुंडेंची धनंजयवर मात

By Admin | Updated: March 21, 2017 16:51 IST2017-03-21T16:51:14+5:302017-03-21T16:51:14+5:30

बीड जिप निवडणुकीतील पराभवाने व्यथित झालेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली

Pankaja Mundechi defeats Dhananjay in Beed Zilla Parishad | बीड जिल्हा परिषदेत पंकजा मुंडेंची धनंजयवर मात

बीड जिल्हा परिषदेत पंकजा मुंडेंची धनंजयवर मात

>प्रताप नलावडे/ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 21 - बीड जिप निवडणुकीतील पराभवाने व्यथित झालेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादीला शह देत भाजपाने सत्तेचे गणित जुळविले. भाजपच्या सविता गोल्हार यांनी ३४ मते मिळवत अध्यक्षपदाची खुर्ची मिळवली.
धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात भाजपचा सफाया केल्यानंतर आता जिपमध्ये अवघे २० सदस्य असतानाही सत्ता मिळवत धनंजय यांच्यावर मात केली. आमदार विनायक मेटे यांच्याशी जुळते घेत पंकजा यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुरुंग लावला. धनंजय यांच्यावर नाराज असलेल्या माजी मंत्री सुरेश धस याचा पाठिंबा मिळविला. अंतर्गत गटबाजीमुळे सत्तेच्या उंबरठ्यावर असलेल्या राष्ट्रवादीला कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आली. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Web Title: Pankaja Mundechi defeats Dhananjay in Beed Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.