राज्यात सत्ता परिवर्तनाद्वारे मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करूया - पंकजा मुंडे
By Admin | Updated: August 28, 2014 16:04 IST2014-08-28T15:29:19+5:302014-08-28T16:04:21+5:30
शेतक-यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणा-या, जनतेला पोकळ आश्वासने देणा-या सरकारला अंधारात लोटून मुंडे साहेबांचे सत्ता परिवर्तनाचे स्वप्न पूर्ण करूया असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

राज्यात सत्ता परिवर्तनाद्वारे मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करूया - पंकजा मुंडे
>ऑनलाइन लोकमत
सिंदखेडराजा, दि. २८ - शेतक-यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणा-या, जनतेला पोकळ आश्वासने देणा-या सरकारला अंधारात लोटून मुंडे साहेबांचे सत्ता परिवर्तनाचे स्वप्न पूर्ण करूया, असे आवाहन पंकजा मुंडे- पालवे यांनी केले. बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे 'संघर्ष' यात्रेला सुरूवात करताना त्या बोलत होत्या.
'सत्ताधा-यांनी अनेक आश्वासने दिली, मात्र ती पूर्ण झाली नाहीत. शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार कधी?' असा प्रश्न विचारत आता राज्यात सामान्य माणसाचे सरकार आणायचे आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यातील महिलांवरील अत्यांचारात वाढ होत आहे, गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, १०० गुन्ह्यांपैकी फक्त ९-१० गुन्ह्यांचीच नोंद होते. गुन्हेगारीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, असे सांगत राज्याची ही हालत करणा-या सरकारला सत्तेवरून हलवूया असे त्या म्हणाल्या. तसेच सत्तेवर आल्यावर सिंदखेडचा विकास करणार असे आश्वासनही त्यांनी दिले.
' ज्यांनी मुंडेसाहेबांना जिवंतपणी यातना दिल्या, त्यांना मृत्यूनंतर साहेबांचा पुळका आलाय' अशा शब्दांत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली.