शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

“मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण ओबीसीतून मिळणे शक्य नाही”; पंकजा मुंडेंची रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 11:36 IST

Maratha Reservation: पंकजा मुंडे म्हणाल्या, मराठा समाजाच्या सर्व तरुणांना हात जोडून विनंती करते की, तुमची जी मागणी...

Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याबाबत शासन निर्णय जारी केला. जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची लेखी विनंती करण्यात आली आहे. मात्र, सरसकट सर्वांना असा उल्लेख नसल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. यातच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी याबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. 

मराठा आरक्षणाचा विषय सध्या महाराष्ट्रात सगळीकडे आहे. मुळात ओबीसीतून आरक्षणाची मराठा समाजाची मागणी नव्हती. त्यांची साधी, प्रामाणिक अशी मागणी होती की आम्हाला आरक्षण द्या. त्यांच्यातील जो समाज वंचित राहिलेला आहे, मुख्य प्रवाहातून बाहेर राहिला होता. त्याला आरक्षण देण्याविषयी सर्वांची मान्यता होता. अगदी गोपीनाथ मुंडे असल्यापासून ते आत्ताच्या सर्व नेत्यांची याला मान्यता आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण ओबीसीतून मिळणे शक्य नाही

पण आमची जी भूमिका आहे ती पहिल्यापासून स्पष्ट आहे. मराठा आरक्षणाला आमचे समर्थन आहे. पण असे कोण म्हटल की, मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण द्या? असे कोणी मगणी करणे आणि ते मिळणे शक्य नसते. संविधानिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी शक्य होत नाहीत. मराठा समाजाला खरे आरक्षण पाहिजे जे कोर्टात टिकेल ते दिले गेले पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

दरम्यान, राजकारणातून काही काळ ब्रेक घेतल्यानंतर पंकजा मुंडे शिवशक्ती परिक्रमा करत आहेत. मराठा आरक्षणासाठी जे तरुण आत्महत्या करताहेत त्यांच्याबाबत मला खूपच वाईट वाटत आहे. मी मराठा समाजाच्या सर्व तरुणांना हात जोडून विनंती करते की, तुमची जी मागणी आहे ती करा, पण त्यासाठी स्वतःचा जीव वैगरे द्यायाचा विचार करु नका. छत्रपती शिवरायांचे आपण वंशज आहोत त्यांच्या विचारांनी लढण्याच्या भूमिकेने लढा. स्वतःचा जीव देण्यासारखे लेकरांनी काम करु नये, या शब्दांत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर रोखठोक भाष्य केले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPankaja Mundeपंकजा मुंडे