शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

बीडमधून पंकजा, अमरावतीत नवनीत राणांच्या हाती कमळ! दोघींच्या उमेदवारीबाबत भाजप अंतर्गत खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 08:13 IST

Loksabha Candidate BJP Maharashtra: नवनीत यांनी शिवसेनेकडून लढावे, असा आग्रह झाला होता. तर अपक्ष लढल्यास पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव भाजपने अमान्य केल्याचे समजते. 

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बीडमध्ये भाजपकडून लोकसभेसाठी कोण? या मुद्यावर पक्षांतर्गत बराच खल झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. दुसरीकडे अमरावतीची जागा महायुतीमध्ये भाजपकडे जाईल आणि तेथे सध्याच्या खासदार नवनीतकौर राणा उमेदवार असतील, असेही समजते. 

विद्यमान खासदार प्रीतम यांचे दुसऱ्या पद्धतीने राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे. २०१४ ची पोटनिवडणूक आणि २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक या दोन्हींमध्ये प्रीतम जिंकल्या होत्या. त्यावेळी त्यांचे बंधू धनंजय हे त्यांच्या विरोधात प्रचाराला उतरले पण यावेळी चित्र वेगळे आहे. पंकजा यांना उमेदवारी पक्की मानली जात असताना धनंजय हे त्यांच्या प्रचारात दिसतील.

राणांच्या भूमिकेकडे लक्षअमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा भाजपकडून लढू शकतात. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि अमरावतीच्या मतदारांना हे चिन्ह अंगवळणी पडले आहे. त्यामुळे नवनीत यांनी शिवसेनेकडून लढावे, असा आग्रह झाला होता. तर अपक्ष लढल्यास पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव भाजपने अमान्य केल्याचे समजते. 

दुरावा कमी झाल्याचा फायदामंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा या दोघांमधील दुरावा कमी झाला आहे. मुंडे भगिनींपैकी कोणीही उमेदवार असले तरी आपण पाठीशी भक्कमपणे उभे राहू असा शब्द धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. पंकजाताईंच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा झाली होती पण तसे झाले नाही. तेव्हा, ‘पंकजाताईंबाबत चांगलेच होईल’ असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले होते. ६ जणांची समितीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांची एक समिती भाजप श्रेष्ठींनी महाराष्ट्रासाठी नेमली आहे.

संभाव्य उमेदवार निश्चित करण्यास या समितीला सांगण्यात आले आहे. या समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आणि त्यात संभाव्य नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

पूनम महाजन यांना उत्तर मध्य मुंबईतून पुन्हा संधी द्यायची की पीयूष गोयल,  आशिष शेलार, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांपैकी एकाला द्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. नंदुरबारमधून डॉ. हीना गावित यांनाच पुन्हा संधी मिळेल, असे म्हटले जाते.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाlok sabhaलोकसभा