शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Pankaja Munde : ‘अंगार-भंगार काय आहे, स्वत:ची लायकी ठेवा’, समर्थकांच्या घोषणाबाजीवर पंकजा मुंडे संतापल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 08:21 IST

Pankaja Munde : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजपची मराठवाड्यातील   जन आशीर्वाद यात्रा परळीतील गोपीनाथ गडावर    मुंडे यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन  सोमवारी सुरू झाली.

परळी (जि. बीड) : तुमच्या बालिशपणाचा मला त्रास होतो. मूर्ख आहात का? हा काही दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का, ही पद्धत आहे का वागायची, ‘मुंडे साहेब अमर रहे’ अशा घोषणा मी रोखू शकत नाही; पण अंगार-भंगार काय आहे, हे मला आवडत नाही. जेवढ्या उंचीची मी, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची, नाही तर मला भेटायला यायचं नाही, अशा स्पष्ट शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावले.  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजपची मराठवाड्यातील   जन आशीर्वाद यात्रा परळीतील गोपीनाथ गडावर    मुंडे यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन  सोमवारी सुरू झाली.  या यात्रेस पंकजा यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. यावेळी मुंडे  समर्थकांनी ‘पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है’,  अशी  घोषणाबाजी केली. यावर पंकजा संतापल्या होत्या.  सकाळी पंकजा यांनी  निवासस्थानी डॉ. कराड यांचे  स्वागत केले. येथेही कार्यकर्त्यांनी घोषणबाजी केली.  येथून श्री वैद्यनाथ मंदिर पायरीचे कराड यांनी दर्शन घेतले.       

गोपीनाथ गड प्रेरणा देणारा : भागवत कराडगोपीनाथगड येथे  केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,  आमचे नेते गोपीनाथ   मुंडे साहेब यांच्या स्मरणार्थ हा  गोपीनाथ गड बांधलेला आहे. ‘हा गड प्रेरणेचा, हा गड ऊर्जेचा’ असे याचे ब्रीद आहे. येथे येणारा  प्रत्येक कार्यकर्ता प्रेरणा घेऊनच जातो. आमच्या नेत्या  पंकजा मुंडे आहेत. त्यांच्या हस्ते यात्रेस सुरुवात करीत आहोत. सोबत खा. प्रीतम मुंडे याही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड