शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा-धनंजय मुंडे यांनी एकत्रित राहावे; मुंडे बहीण-भाऊ प्रथमच एका व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 07:47 IST

जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे

परळी (जि. बीड) : परळीतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पंकजा मुंडेधनंजय मुंडे हे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर एकत्रित होते. पंकजा व धनंजय तुम्ही असेच एकत्र राहा. आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठीशी आहे. हा मंच असाच एकत्रित राहू द्या, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे या पालकमंत्री असतानाच्या कामांचा उल्लेख केला. तसेच आता धनंजय मुंडे यांना निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वासही दिला.

केंद्र शासनाच्या  प्रसाद योजनेत परळी वैद्यनाथचा समावेश करण्यासाठी आपण स्वतः केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू. परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग परिपूर्ण विकासाने समृद्ध होईल. सध्या मराठवाडा दुष्काळाच्या छायेमुळे संकटात आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. मात्र, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. शासन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. 

बाजूच्या घरातही तुम्हाला बोलवत नाहीत...ज्यांना कोणी बाजूच्या घरातही बोलवत नाहीत, असे लोक आमच्यावर टीका करू लागले आहेत. आम्हाला प्रचारासाठी परराज्यातही बोलवतात, यामुळे विरोधकांचे पोट दुखू लागल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. आता पुढच्या वेळी अजित पवार यांनाही सोबत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना पुढच्या अडीच वर्षांत सोलार पंप देणारजलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी बारा तास वीज कशी मिळेल यासाठी पुढच्या अडीच वर्षांत सोलार पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले. लेक माझी भाग्याची, लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्या कुटुंबात मुलीने जन्म घेतला ते कुटुंब लखपती करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. भाषणाच्या प्रारंभी फडणवीस यांनी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या ऊर्जेमुळेच आपण राजकारणात असल्याचा उल्लेख करत त्यांना अभिवादन केले.

मराठवाड्याला  हक्काचे पाणीनिसर्गावर अवलंबून न राहता कायमस्वरूपी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचनाच्या विविध योजना आखण्यात आल्या आहेत.  मराठवाड्याला त्यांचे हक्काचे पाणी देण्याचा निर्धार सरकारने केला आहे. इतरत्र वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देऊ. मराठवाडा दुष्काळमुक्त केला जाईल. बीडच्या पाण्याचाही प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे