पंकजा मुंडेंना मुख्यमंत्र्यांची समज!
By Admin | Updated: July 11, 2016 06:02 IST2016-07-11T06:02:05+5:302016-07-11T06:02:05+5:30
‘आपण वरिष्ठ मंत्री असल्याने परिषदेला उपस्थित राहिले पाहिजे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना समज दिली.

पंकजा मुंडेंना मुख्यमंत्र्यांची समज!
मुंबई/अहमदनगर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपात जलसंधारण व रोजगार हमी, ही महत्त्वाची खाती काढून घेतल्यामुळे नाराज झालेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सिंगापुरातील जागतिक पाणीपरिषदेला उपस्थित राहाणार नसल्याचे टिष्ट्वटरवरून जाहीर करताच, ‘आपण वरिष्ठ मंत्री असल्याने परिषदेला उपस्थित राहिले पाहिजे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली. दरम्यान, परळी व पाथर्डी (जि. नगर) येथील पंकजा समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळून आपला राग व्यक्त केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले.
रशिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी रात्री उशिरा खातेवाटपाची यादी जाहीर केली. या फेरबदलात पंकजा मुंडे, विनोद तावडे व प्रकाश मेहता या तीन वरिष्ठ मंत्र्यांचे पंख छाटले गेले. पंकजा यांच्याकडील जलसंधारण व रोजगार हमी अशी दोन खाती काढून ती अनुक्रमे प्रा. राम शिंदे व जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आली. मंत्रिमंडळात रावल यांचा नव्याने समावेश झाला आहे, तर शिंदे यांना कॅबिनेटमध्ये बढती देण्यात आली आहे.
जागतिक पाणी परिषदेसाठी सिंगापुरला गेलेल्या पंकजा यांना तिथे या फेरबदलाची बातमी कळताच ‘आता आपण जलसंधारण मंत्री नसल्यामुळे सिंगापूरमध्ये होणाऱ्या पाणी परिषदेला उपस्थित राहू शकत नाही’ असे टिष्ट्वट करून आपली नाराजी व्यक्त केली. त्यावर लागलीच मुख्यमंत्र्यांनी समजूत काढत ‘तुम्ही वरिष्ठ मंत्री असल्याने सरकारची प्रतिनिधी म्हणून परिषदेला उपस्थित राहा’ असा आदेश पंकजा यांना टिष्ट्वटरवरूनच दिला!
पाथर्डीत निदर्शने
जलसंधारण खाते काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या पंकजा समर्थकांनी पाथर्डीत मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मुकुंद गर्जे, पंचायत समितीचे माजी सभापती संपत कीर्तने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंकजा आणि वाद
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसात चिक्की खरेदी घोटाळा समोर आला. पंकजा यांच्याकडील महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतील मुलांसाठी खरेदी केलेली चिक्की निकृष्ट असल्याचा आरोप झाला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
जायकवाडी धरणातील पाणी औरंगाबादेतील दारू उत्पादक कारखान्यांना देण्यास विरोध झाल्यानंतर पंकजा यांनी दारू कारखान्यांची बाजू घेतली. पंकजा यांच्या पतीच्या नावे मद्यनिर्मितीचा कारखाना असल्याचे समोर आले.
शनिशिंगणापुरातील शनि चौथाऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यावरून आंदोलन पेटले असता पंकजा यांनी देवस्थानची बाजू घेत महिलांनी परंपरेचे पालन केले पाहिजे, असा सल्ला दिला होता.
दुष्काळात होरपळुन निघालेल्या लातुरातील बंधाऱ्याच्या कामाला भेट देताना काढलेल्या सेल्फीवरून बरेच वादंग उठले होते.
‘जलयुक्त शिवार’ ही मुख्यमंत्र्यांनी आखलेली महत्वाची योजना असताना पंकजा यांनी जलसंधारण कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. सतत वादग्रस्त ठरत असल्याने पक्षश्रेष्ठीही नाराज