शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मानधनवाढ होऊनही संप सुरू ठेवणे चुकीचे, उर्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने रुजू व्हावे- पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 9:24 PM

मानधनवाढीची मागणी शासनाने मान्य केलेली असताना देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी अजूनही संप सुरू ठेवला आहे.

मुंबई : मानधनवाढीची मागणी शासनाने मान्य केलेली असताना देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी अजूनही संप सुरू ठेवला आहे. हे चुकीचे असून उर्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे घेऊन सेवेवर रुजू व्हावे, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागणीस अनुसरुन आमच्या शासनाने मागील तीन वर्षात दोन वेळा मानधनवाढ केली आहे. २०१४-१५ मध्ये २८९ कोटी रुपयांची तर आता साधारण ३६३ कोटी रुपयांची ऐतिहासिक मानधनवाढ केली आहे. नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची मानधनवाढ करण्यात आली आहे. त्यांच्या एकूण मानधनाच्या ३० टक्के इतकी ही वाढ आहे. यापुर्वी एका वेळेस इतकी मानधनवाढ कधीही देण्यात आली नव्हती. याशिवाय भाऊबीजही दुप्पट करण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन व इतर मागण्यांबाबत भविष्यात अजुनही निर्णय घेण्याबाबत शासन पूर्ण सकारात्मक आहे. पण आत्ताच मानधनवाढ दिली असताना ती मान्य न करता अधिक मानधनवाढीसाठी बालकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नसून उर्वरीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे घेऊन सेवेवर हजर व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.जेलभरोसारखे आंदोलन चुकीचे - कमलाकर फंडआपल्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभरोसारखे आंदोलन करणे चुकीचे व बेकायदेशीर असून शासकीय कर्मचाऱ्यांकडून अशी कृती कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही, असे एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे आयुक्त कमलाकर फंड यांनी कळविले आहे. आंदोलनकाळात शासनाचे मुख्यमंत्री, मंत्री यांच्यावर वैयक्तिक शेरेबाजी करणे, व्यंगचित्रे - फलक याद्वारे त्यांची वैयक्तिक बदनामी करणे, पुतळे जाळणे हेही चुकीचे आहे. संप करणे, निवेदन देणे असे वैधानिक मार्ग उपलब्ध असताना इतर बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करणे चुकीचे आहे. अशी कृती केल्यास शासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे आयुक्त फंड यांनी कळविले आहे.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे