पंकज भुजबळ यांची चौकशी लांबणीवर
By Admin | Updated: February 22, 2015 01:39 IST2015-02-22T01:39:25+5:302015-02-22T01:39:25+5:30
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभ मेळयाचे निमित्त करून माजी आमदार व छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणारी चौकशी काही दिवसांसाठी टाळली.

पंकज भुजबळ यांची चौकशी लांबणीवर
मुंबई : नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभ मेळयाचे निमित्त करून माजी आमदार व छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणारी चौकशी काही दिवसांसाठी टाळली. आता त्यांची चौकशी पुढल्या आठवडयात होईल, असे समजते.
आपच्या नेत्या अंजली दमानिया व इतरांच्या रिट याचिकेवरून उच्च न्यायालयाने भुजबळ व कुटुबियांची उघड चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कालपासून एसीबीने उघड चौकशी सुरू केली. काल भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांची सुमारे तीन तास एसीबीच्या वरळी येथील मुख्यालयात चौकशी झाली. एसीबीने त्यांना सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.
दरम्यान, आज पंकज यांना एसीबीने चौकशीसाठी बोलावल होते. मात्र सिंहस्थ कुंभ मेळयासाठी आयोजित एका बैठकीला हजर राहाणे आवश्यक असल्याचे कारण सांगून पंकज यांनी एसीबीकडे मुदत मागितली. एसीबीने त्यांना पुढील तारिखी दिली आहे. समीर, पंकज यांच्यानंतर एसीबी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना चौकशीसाठी बोलविले जाईल, अशी शक्यता आहे.
च्समीर, पंकज यांच्यानंतर एसीबी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना चौकशीसाठी बोलविले जाईल, अशी शक्यता आहे.