पंकज भुजबळांनी साक्षीदाराला धमकाविले
By Admin | Updated: May 19, 2017 00:53 IST2017-05-19T00:53:55+5:302017-05-19T00:53:55+5:30
आर्थर रोड जेलमध्ये सर्व सुविधा मिळत असल्याच्या आरोपामुळे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ चर्चेत आले असताना त्यांचे पुत्र व आमदार पंकज भुजबळ

पंकज भुजबळांनी साक्षीदाराला धमकाविले
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुुंबई : आर्थर रोड जेलमध्ये सर्व सुविधा मिळत असल्याच्या आरोपामुळे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ चर्चेत आले असताना त्यांचे पुत्र व आमदार पंकज भुजबळ यांनी दोघा माफीच्या साक्षीदाराला न्यायालयाच्या आवारात धमकाविल्याची घटना घडली आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) न्यायालयात बुधवारी घडलेल्या या घटनेबाबत कुलाबा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये सुरुवातीला सुधीर मनोहर साळसकर व अमीत बलराज हे सहआरोपी होते. मात्र त्यानंतर गुन्ह्याची कबुली देत माफीचा साक्षीदार बनले आहेत.
भुजबळ कुटुंबीयांच्या बेनामी मालमत्तेप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या ‘एमआयटी’च्या खटल्यामध्ये सुधीर मनोहर साळसकर व अमीत बलराज हा माफीचा साक्षीदार बनला आहे. बुधवारी सुनावणीवेळी कोर्टाच्या आवारात पंकज भुजबळ यांनी शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे.