पंकज भुजबळांची न्यायालयापुढे शरणागती
By Admin | Updated: January 21, 2017 23:16 IST2017-01-21T23:16:06+5:302017-01-21T23:16:06+5:30
मनी लाँड्रिंग केसप्रकरणी पंकज भुजबळ यांनी शनिवारी विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अॅक्ट) न्यायालयापुढे शरणागती पत्करली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

पंकज भुजबळांची न्यायालयापुढे शरणागती
मुंबई : मनी लाँड्रिंग केसप्रकरणी पंकज भुजबळ यांनी शनिवारी विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अॅक्ट) न्यायालयापुढे शरणागती पत्करली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.
मनी लाँड्रिंग केसप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांचा पुतण्या समीर भुजबळ न्यायालयीन कोठडीत आहेत. ‘पंकज यांनी विशेष न्यायालयापुढे शरणागती पत्करली. न्यायालयाने त्यांची २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली,’ अशी माहिती पंकज यांचे वकील शलभ सक्सेना यांनी दिली. यापूर्वी पंकज यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांनी जामीन अर्ज मागे घेतला. तसेच विशेष न्यायालयापुढे शरणागती पत्करण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले. तपासादरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पंकज भुजबळ यांना कधीच अटक केली नाही. त्यामुळे विशेष न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला, असे सक्सेना यांनी सांगितले. महाराष्ट्र सदन बांधकामात अनियमितता आढळल्याने ईडीने छगन भुजबळांना अटक केली. (प्रतिनिधी)