पान मसाला पुडीत निघाली पाल

By Admin | Updated: July 28, 2016 17:39 IST2016-07-28T17:39:57+5:302016-07-28T17:39:57+5:30

पान मसाला पुडीत चक्क मृत पाल निघाल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील बेलोरा येथे गुरुवारी उघडकीस आला.

Pane masala podit pagina sab | पान मसाला पुडीत निघाली पाल

पान मसाला पुडीत निघाली पाल

ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. २८ : पान मसाला पुडीत चक्क मृत पाल निघाल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील बेलोरा येथे गुरुवारी उघडकीस आला. ही पाल पाहताच पान मसाला पुडी खरेदी करणाऱ्याला दरदरून घाम फुटला.
महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी असल्याने विक्रेत्यांनी आता नवीन शक्कल लढविली आहे. पान मसाला पुडी आणि त्यासोबत जर्दा पुडी विकत घेवून त्याचे मिश्रण तयार केले की गुटखा तयार होतो.

अशीच केशरयुक्त म्हणून जाहिरात करणाऱ्या एका कंपनीची पान मसाला पुडी पुसद तालुक्यातील हिवळणी येथील अशोक कनिराम जाधव यांनी गुरुवारी बेलोराच्या पानटपरीवरून विकत घेतली. पुडी फोडताच त्यांच्या हातावर चक्क मृत पाल आली. सुदैवाने त्यांनी पुडी फोडून थेट तोंडात न टाकल्याने व पान मसाला हातावर घेतल्याने हा प्रकार नजरेस आला.

Web Title: Pane masala podit pagina sab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.