गूढ आवाजाने पंढरपूरकर संभ्रमात
By Admin | Updated: July 12, 2016 21:20 IST2016-07-12T21:20:57+5:302016-07-12T21:20:57+5:30
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारीसाठी वैष्ठवांची मांदियाळी पंढरीत जमत असतांना मंगळवारी झालेल्या गूढ आवाजाने सारेच संभ्रमात पडले आहेत.

गूढ आवाजाने पंढरपूरकर संभ्रमात
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 12 - दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारीसाठी वैष्ठवांची मांदियाळी पंढरीत जमत असतांना मंगळवारी झालेल्या गूढ आवाजाने सारेच संभ्रमात पडले आहेत.
खूप लांब एखादा स्फोट व्हावा त्यामुळे असा एक मोठा आवाज पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात आला. त्यामुळे नागरिक घाबरून रस्त्यावर आले मात्र हा आवाज नेमका कशाचा होता याची खात्रीशिर माहिती प्रशासनाकडे नाही.
यापूर्वी अशा पध्दतीचा आवाज पंढरपूरात कधीच आला नसल्याचे अनेक नागरिकांनी आणि प्रशासनाने सांगितले. याबाबत भूगर्भशास्त्र तज्ञ डॉ. श्रीनिवास वडकबाळकर म्हणाले की, केवळ २५ किमी अंतराच्या परिसरात जर हा आवाज असेल तर तो जमिनीच्या खालून आला नसावा. कारण भुकंप इतक्या कमी अंतरामध्ये होत नसतो. त्याची व्याप्ती मोठी असते. मात्र जवळपास एखाद्या खानकामात स्फोट सुरु असतील व त्याची तीव्रता वाढली असेल तर त्यामुळे तसा आवाज येऊ शकतो. शिवाय हा आवाज आकाशातून सुध्दा आलेला असू शकेल. भारतीय वायू सेनेचे अल्ट्रॉसॉनिक विमाने आकाशातून नेहमीच जातात असतात. वैमानिकाने जर त्याचे विमान प्रमाणापेक्षा खाली आणून पुन्हा चटकन वर नेले असेल तर वायूच्या दाबामुळे पंधरा-वीस किलोमिटरच्या पट्ट्यात तसा आवाज येऊ शकतो.
—-
नागरिकांनी घाबरू नये
हा आवाज भुकंपाचा नसून केवळ दहा-पंधरा किमीच्या पट्ट्यात भुकंप होत नाही. आकाशातून गेलेल्या अल्ट्रासॉनिक विमानामुळे आवाज येण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी घाबरू नये व अफवा पसरवू नये असे आवाहन प्रशासनाने केले.