शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Pandharpur Wari: आषाढी वारीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:54 IST

Pandharpur Wari: कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी पहिल्यांदाच वारीची ही दीर्घ ऐतिहासिक परंपरा खंडित झाली. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे :  महाराष्ट्राची शेकडो वर्षांची जुनी आध्यात्मिक परंपरा असलेला आषाढी एकादशीनिमित्त निघणारा पालखी सोहळा यंदा निघावा की नाही, या संदर्भातला निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत घेतला जाणार आहे.दरवर्षी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांची, तर देहूगावातून तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवते. राज्यभरातले हजारो वारकरी या दोन्ही पालखी सोहळ्यांमधल्या शेकडो दिंड्यांमध्ये सहभागी होत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी पहिल्यांदाच ही दीर्घ ऐतिहासिक परंपरा खंडित झाली. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आषाढी वारीच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी पुण्यात बैठक झाली. देहू आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळ्याचे प्रमुख व ज्येष्ठ वारकऱ्यांनी यावेळी काही अटी-शर्तींसह पायी पालखी सोहळ्यास परवानगी द्यावी, यासाठी प्रचंड अग्रह धरला. मात्र राज्यात पहिल्या लाटेपेक्षा सध्या खूप गंभीर परिस्थिती आहे. गर्दी झाल्यानंतर कोरोना आटोक्याबाहेर जातो, याची राज्यात आणि देशात अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. तरीदेखील वारीसंदर्भात सर्वांच्या भावना लक्षात घेऊन येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.पालखी सोहळ्याच्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य अधिकारी ऑनलाईन बैठकीसाठी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांना पवार यांनी सांगितले की, सर्व विश्वस्त व वारकरी संप्रदाय पायी वारीसाठी आग्रही आहे. मात्र, आजही महाराष्ट्रात १८ जिल्हे असे आहेत की जिथे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे.  

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAlandiआळंदीdehuदेहूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस