शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

पंढरपूर वारी २०१९ : वैष्णवांच्या मेळ्यावर वरुणराजा बरसले.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 21:05 IST

राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी ऊन, वारा, पाऊस झेलत आतापर्यंतचा प्रवास केला आहे..

ठळक मुद्देपालखी सोहळ्याचे उभे रिंगण पूर्ण झाले हा संपूर्ण सोहळा न भूतो न भविष्यती वाखरी येथे मुक्काम करुन हा वैष्णवांचा मेळा उद्या पंढरीकडे मार्गस्थ होणार

वैष्णवांचा मेळा पटकांचा भारवाखरीस जमला भक्तीचा सागर पांडुरंगाच्या भेटीसाठी केला आटापिटा भक्तीसागरात उसळती भक्तीच्या लाटा..!   - तेजस टवलारकर  पंढरपूर : तुकाराम महाराजाचा पालखी सोहळा हा आता अंतिम टप्यात आला आहे,. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरीरायाला भेटण्याची उत्सुकता लागली आहे. ऊन, वारा, पाऊस, याचा मारा झेलत आतापर्यंतचा प्रवास वारकऱ्यांनी केला आहे . राज्य भरातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. काही भागात पाऊस आहे, तर काही भागात अजून देखील म्हणावा तसा पाऊस झालेला नाही तरीदेखील वारकरी निराश न होता माऊली, तुकारामाचा जयघोष करीत, रिगणं, खेळ, भारुड , आदींचा आनंद घेत पंढरीरायाच्या दर्शनाला आनंदात जात आहे. 

आता अंतर कमी असल्यामुळे पिराची कुरोली येथून मुक्काम आटपून दुपारी पालखी सोहळा वाखरीच्या दिशेने मार्गस्थ झाला, यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

सर्वत्र माऊलीचा आणि तुकारामांचा जयघोष सुरू होता. टाळ, मृदंगाचा गजर सुरू होता , झेंडेकरी झेंडे फडकवत होते, अशा भक्तिमय वातावरण पालखी सोहळा बाजीराव विहीर परिसरात पोहचला आकाशातून जसजसा पावसाचा रंग चढत होता तसा वारकऱ्यांचा उत्साह हा वाढतच होता.  सर्वत्र माऊली तुकारामाचा गजर सुरू होता. पावसाचा आनंद घेत वारकरी नाचत होते. त्यानंतर सर्व वारकऱ्यांना आतुरता लागली होती ती बाजीराव विहीरीजवळ होणाऱ्या उभ्या रिंगणाची अश्व रिंगण स्थानी आले आणि सर्वत्र जयघोष सुरू झाला.आकाशातून बरसणारा पाऊस , सर्वत्र फडकणाऱ्या भगव्याला पताका अशा भक्तिमय वातावरणात तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगण पूर्ण झाले हा संपूर्ण सोहळा न भूतो न भविष्यती असा होता.बाजीराव विहीर परिसरात विठ्ठल नामाच्या गजर करत समस्थ वारकरी भक्ती रसात व वरुणराजाच्या वर्षवात चिंब भिजला होता.
आपल्या सावळ्या विठ्ठलाचे रुप पाहण्यासाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी अतुरलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. बाजीराव विहीर परिसरात तुकोबांच्या  दर्शनासाठी वारकरी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांचे हात आपसूक खाली जात होते. पंढरीची वारी जयाचिया कुळी... त्याची पाय धुळ लागो मज या संत वचनाप्रमाणे वारकऱ्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लागावी यासाठी भाविक आतुरलेला होता. हा रिंगण सोहळ्यानंतर संताच्या पालख्या वाखरी येथे मुक्काम करुन हा वैष्णवांचा मेळा उद्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे..........................सर्व पालख्या वाखरीत मुक्कामी  पंधरपुरला विठ्ठरायाच्या भेटीला जाणाऱ्या सर्व पालख्याचा मुक्काम बुधवारी वाखरीत असणार आहे. त्यामुळे वाखरीत वारकऱ्यांची , प्रचंड गर्दी झाली आहे. बुधवारचा मुक्काम आटपून गुरुवारी सर्व संतांचा पालखी सोहळा पंढरपूरला पोहचेल. परिसरातील भाविकांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे............घरो घरी जेवणावळी पालखी सोहळा हा अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे.वारकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे.पालखी सोहळा ज्या गावातून जातो, त्या सर्व गावात घरो घरी जेवणावळीचे आयोजन करण्यात आले आहे. ...................पावसामुळे उत्साहात पडली भर  पंढरपूरला जाणाऱ्या सर्व पालख्या या एकाच मार्गानि जात आहेत.आघावया काही अंतरावर पंढरपूर येऊन ठेपल आहे. त्यात पाऊस आल्याने वारक?्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा