पंढरपुरात पोलिसांना केली मारहाण

By Admin | Updated: December 26, 2016 18:04 IST2016-12-26T18:04:29+5:302016-12-26T18:04:29+5:30

दोन पोलिसांना शासकीय काम करताना असताना आरोपींच्या बाजूने आलेल्या राजेंद्र दत्तात्रय भिंगे (वय ३८, रा. उमानगर, इसबावी, पंढरपूर) यांनी मारहाण केली

Pandharpur police beat up | पंढरपुरात पोलिसांना केली मारहाण

पंढरपुरात पोलिसांना केली मारहाण

ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. 26 - येथील दोन पोलिसांना शासकीय काम करताना असताना आरोपींच्या बाजूने आलेल्या राजेंद्र दत्तात्रय भिंगे (वय ३८, रा. उमानगर, इसबावी, पंढरपूर) यांनी मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात घडली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमलाबाई हरिभाऊ तारे (वय ६६, रा. गोविंदपुरा, पंढरपूर) यांनी देविदास दत्तात्रय कांबळे (रा. पद्मशाळी धर्मशाळेसमोर पंढरपूर) यांच्या विरोधात तक्रार दिली होती. यावेळी देविदास कांबळे यांच्या बाजूने राजेंद्र दत्तात्रय भिंगे (वय ३८, रा. उमानगर, इसबावी, पंढरपूर) हे पोलीस ठाण्यात आले. याच दरम्यान त्यांनी या तक्रारीचा राग मनात धरून तक्रारदार यांचा नादू अदित्य ज्ञानेश्वर तारे यास शिवीगाळ करून हाताने मारहाण करू लागला. 

यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार काकासाहेब पुरुषोत्तम व्यवहारे (वय ५७, पंढरपूर शहर पोलीस ठाणे) व पोना. घाटगे हे समजून सांगत होते. या पोलीस कर्मचाऱ्यांना गच्चीला धरून शिवीगाळ करून त्यांच्या गुप्त भागावर पायाचा गुडखा मारून जखमी करून सरकार कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार सहाय्यक पोलीस फौजदार काकासाहेब पुरुषोत्तम व्यवहारे यांनी दिली आहे.

Web Title: Pandharpur police beat up