पंढरपूर: विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
By Admin | Updated: June 25, 2016 15:49 IST2016-06-25T14:19:28+5:302016-06-25T15:49:26+5:30
ढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

पंढरपूर: विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २५ - पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजूबाई राजानी असे त्यांचे नाव असून त्या मूळच्या मुंबईतील उल्हासनगर येथील रहिवासी आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ६० वर्षांच्या राजानी देवदर्शनासाठी शुक्रवारी पंढरपूर येथे आल्या होत्या. शनिवारी त्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्या खाली कोसळल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर उपचारांसाठी मंदिर प्रशासनाकडे मदत मागितली, मात्र त्यांच्या मदतीसाठी कोणीच पुढे आले नाही. परिणामी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत.
महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अखेर जाग आलेल्या मंदिर प्रशासनाने पंढरपूर मंदिरात वैद्यकीय पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच तातडीने रुग्णवाहिकाही खरेदी करण्याचाही निर्णय घेतला आहे.