शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

पॅनकार्ड क्लबपीडित सेबीवर धडकणार

By admin | Updated: July 6, 2017 05:05 IST

पॅनकार्ड क्लब लिमिटेड या मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनीकडून फसवणूक झालेल्या लाखो गुंतवणूकदारांनी एकत्रित येत, लढा देण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पॅनकार्ड क्लब लिमिटेड या मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनीकडून फसवणूक झालेल्या लाखो गुंतवणूकदारांनी एकत्रित येत, लढा देण्यासाठी इन्वेस्टर्स फोरम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. या फोरमतर्फे सेबीवर दबाव निर्माण करण्यासाठी आॅगस्ट महिन्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाआधी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा आणि मोर्चे निघणार असून, त्याची सुरुवात ९ जुलैला नाशिकमधून होणार आहे.बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उटगी म्हणाले की, सेबीने केलेल्या चौकशीत ५१ लाख गुंतवणूकदारांची ७ हजार ०३५ कोटी रुपयांची देणी कंपनीकडे थकीत आहेत. देशासह विदेशातील ४४ हॉटेलमध्ये वास्तव्य आणि सव्वासहा वर्षांत रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत कंपनीने ही रक्कम गोळा केली. १९९७ साली सुरू झालेल्या या कारभाराला २०१२ सालानंतर वाच्यता फुटली. त्यानंतर प्रथम सेबी आणि अपिलीय लवादाने पॅनकार्ड क्लब कंपनीला गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश मे २०१७ मध्ये दिले. मात्र त्यानंतर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी हा लढा सुरू केल्याचे उटगी यांनी सांगितले. या लढ्यात सेबीने तपास यंत्रणांना आदेश देऊन कंपनीच्या मालमत्तांवर टाच आणून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत, ही प्रमुख मागणी आहे. बहुतेक गुंतवणूकदार हवालदिल होऊन सेबीकडे अर्ज करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांनी फोरमकडे नोंदणी करून सेबीकडे दाव्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन उटगी यांनी केले आहे. दावा दाखल करण्यासाठी फोरमच्या केईएम रुग्णालयासमोरील पित्तलवाला इमारतीतील कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.टिष्ट्वंकलवरही बंदीसिट्रस चेक इन्स, रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांवर संशयास्पद योजना चालवण्याप्रकरणी सेबीने बंदी घातली आहे. शिवाय कंपनीच्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. एनसीएलटीने इन्सॉलव्हन्सी प्रोफेशन म्हणून सीए देवेंद्र जैन यांची नियुक्ती कंपनीचा ताबा मिळवण्यासाठी केली आहे.