पानसरे हत्येचा छडा लावणारच!

By Admin | Updated: March 2, 2015 01:53 IST2015-03-02T01:53:05+5:302015-03-02T01:53:05+5:30

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा छडा लावून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळणारच; फक्त थोडा वेळ द्या, असा विश्वास पोलीस अधीक्षक

Panasarera will kill the murder! | पानसरे हत्येचा छडा लावणारच!

पानसरे हत्येचा छडा लावणारच!

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा छडा लावून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळणारच; फक्त थोडा वेळ द्या, असा विश्वास पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या पथकाने रविवारी विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला.
पानसरे यांच्या हत्येला १६ दिवस उलटूनही मारेकऱ्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. दिवस-रात्र मेहनत घेऊनही धागेदोरे हाती लागत नसल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास कोल्हापूर पोलिसांनी ५ लाख, तर राज्य शासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले़ परंतु हल्लेखोरांची माहिती देणारा एकही फोन अजून आलेला नाही.
विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी रविवारी तपासाचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी याआधी तीन गुंतागुंतीच्या घटनांचा उलगडा केला आहे. तपास यंत्रणेमधील संपूर्ण पथके अहोरात्र काम करीत असून आम्हाला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास डॉ. शर्मा यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Panasarera will kill the murder!