‘पानसरे हत्येचा तपास धर्मांध शक्तीच्या दिशेने व्हावा’

By Admin | Updated: August 31, 2015 01:23 IST2015-08-31T01:23:11+5:302015-08-31T01:23:11+5:30

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला सहा महिने तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे झाली आहेत; मात्र अद्याप मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही.

'Panasarera murder should be investigated against fanaticism' | ‘पानसरे हत्येचा तपास धर्मांध शक्तीच्या दिशेने व्हावा’

‘पानसरे हत्येचा तपास धर्मांध शक्तीच्या दिशेने व्हावा’

बीड : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला सहा महिने तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे झाली आहेत; मात्र अद्याप मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा धर्मांध शक्तीच्या दिशेने असायला हवी, असे मत कॉ. पानसरे यांची कन्या तथा भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे यांनी व्यक्त केले.
बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतच्या तपासाची माहिती आम्हाला सांगितली जात नाही. तपास वेगाने सुरू असल्याचे पोलीस सांगत आहेत, तर तपासाचे काम सुरू असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. अशी चौकटीबद्ध उत्तरे वारंवार दिली जात आहेत. राजकीय इच्छाशक्तीशिवाय मारेकरी सापडणार नसल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: 'Panasarera murder should be investigated against fanaticism'