पालघरचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन
By Admin | Updated: May 24, 2015 17:22 IST2015-05-24T09:31:32+5:302015-05-24T17:22:15+5:30
पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे रविवारी पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

पालघरचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन
ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. २४ - पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे रविवारी पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.
शनिवारी मनोरजवळील लग्नसोहळा आटपून कृष्णा घोडा घरी परतत होते. रात्री दोनच्या सुमारास घोडा यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घोडा हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. १९८८ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर, तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत घोडा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांचा पराभव केला होता. नुकत्याच पार पडलेल्या ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते.