पालघरमध्ये घराला भीषण आग, २ महिला मृत्यूमुखी
By Admin | Updated: January 12, 2017 10:05 IST2017-01-12T10:01:26+5:302017-01-12T10:05:58+5:30
पालघरमधील जव्हार येथील घराला भीषण लागून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

पालघरमध्ये घराला भीषण आग, २ महिला मृत्यूमुखी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - पालघरमधील जव्हार येथील घराला भीषण लागून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली.
जव्हार मधील तारपा चौकात कुरेशी यांचे घर आहे. रात्री अडीचच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. मात्र अनेकजण गाढ झोपेत असल्याने अनेकांना आग लागल्याचे समजले नाही व त्यामुळे दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. घरात सगळीकडे धुराचे लोट पसरले होते. आयेशी कुरेशी व महरूम कुरेशी असे मृत महिलांचे नाव आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत असून पोलिस पुढील तपास करत आहेत.