पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 11:49 IST2016-02-16T11:33:13+5:302016-02-16T11:49:02+5:30

पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. येथून शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा विजयी झाले आहेत.

In the Palghar bye-election Amit Ghoda of Shiv Sena won | पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा विजयी

पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा विजयी

ऑनलाइन लोकमत 

पालघर, दि. १६ - पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. येथून शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांच्यावर जवळपास १८ हजार ९४८ मतांनी विजय मिळवला. 
बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार मनिषा निमकर तिस-या स्थानावर राहिल्या. आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. शिवसेना-भाजपने या पोटनिवडणुकीसाठी युती केली होती. कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन कृष्णा घोडा यांचे सुपूत्र अमित घोडा यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. 
शनिवारी या पोटनिवडणुकीसाठी जवळपास ६५ टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याफेरीपासून अमित घोडा यांनी आघाडी घेतली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत टिकवली. देशातील आठ राज्यातील १२ विधानसभांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. 
 

Web Title: In the Palghar bye-election Amit Ghoda of Shiv Sena won