कॉमेडी नाईटसमधील पलक ऊर्फ किकू शारदाला अटक
By Admin | Updated: January 13, 2016 13:59 IST2016-01-13T13:46:13+5:302016-01-13T13:59:16+5:30
विनोदी अभिनेता किकू शारदाला धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

कॉमेडी नाईटसमधील पलक ऊर्फ किकू शारदाला अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - विनोदी अभिनेता किकू शारदाला धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. किकूवर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु गुरमीत राम रहीम सिंग यांच्या पाठिराख्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे.
न्यायालयाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात पलक म्हणून लोकप्रिय असलेल्या किकूने या कार्यक्रमात गुरमीत राम रहीम सिंग यांची नक्कल केली होती. २७ डिसेंबरच्या कार्यक्रमात त्याने गुरमीत राम रहीम सिंग यांची नक्कल केली होती.
या प्रकरणी एक जानेवारीला गुन्हा दाखल झाला मात्र बुधवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. किकू रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत कॉमेडी नाईटसचे चित्रीकरण होता. त्यानंतर त्याला अटक करुन गोरेगावच्या आरे पोलिस स्थानकात नेण्यात आले.
किकूला दिल्ली येथे नेण्यात येईल तिथून त्याला पुढील चौकशीसाठी हरयाणा येथे नेण्यात येईल. गुरमीत राम रहीम यांच्या पाठिराख्यांच्या संतापानंतर किकूने माफीही मागितली होती.