दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिमांनी जाळला पाकिस्तानचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 18:17 IST2016-09-21T17:13:59+5:302016-09-21T18:17:02+5:30
काश्मिर खोऱ्यातील उरी शहरातील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लातुरातील मुस्लिम बांधवांनी बुधवारी दुपारी अमर रहे

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिमांनी जाळला पाकिस्तानचा झेंडा
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. २१ : काश्मिर खोऱ्यातील उरी शहरातील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लातुरातील मुस्लिम बांधवांनी बुधवारी दुपारी अमर रहे, अमर रहे, शहीद जवान अमर रहे,पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत, पाकिस्तानचा झेंडा जाळला़
काश्मिरमधील उरी शहरातील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी अमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रारंभी शहरातील महात्मा गांधी चौकातून निषेध रॅली काढण्यात आली़ ही रॅली गंजगोलाई- स्वामी विवेकानंद चौक मार्गे पुन्हा गांधी चौकात परतली़ त्यानंतर छत्रपती शिवाजी चौक मार्गे अंबाजोगाई रोड, दयानंद गेट, राजीव गांधी चौकातून रिंग रोडने मिनी मार्केटमध्ये आली़
यानंतर मुस्लिम बांधवांनी नमाजची टोपी घालून गांधी चौकात पाकिस्तानचा उलटा ध्वज हातात धरुन ह्यकाश्मिर मांगोगे, तो काट देंगे, पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या़ पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून जाळण्यात आला़. यावेळी अमन सेवाभावी संस्थेचे संस्थापक हातीमभाई शेख, विलास धोतरे, मन्सूर शेख यांच्यासह जवळपास २०० जण उपस्थित होते़