पाकिस्तानी कलाकारांना धमकी, पोलिसांची मनसेला नोटीस
By Admin | Updated: September 24, 2016 21:40 IST2016-09-24T21:40:25+5:302016-09-24T21:40:25+5:30
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांनी १४९ कलमाअंतर्गत नोटीस बजावली आहे

पाकिस्तानी कलाकारांना धमकी, पोलिसांची मनसेला नोटीस
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांनी १४९ कलमाअंतर्गत नोटीस बजावली आहे. उरी येथील हल्ल्यानंतर सवर्च स्तरातून पाकिस्तानचा निषेध करण्यात येत आहे. पाकिस्तान कलाकारांना मनसेने इशारा दिला. पाकिस्तानी कलावंताबाबत मांडलेल्या भूमिकेमुळे मनसे कार्यकर्त्यांकडून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानी कलावंतानी ४८ तासांच्या आत मायदेशी परत जावं अन्यथा जिथे काम करत असाल तिथे घुसून मारू' असा खोपकर यांनी धमकी वजा इशारा दिलाय. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.