पाक अभिनेत्रीचे लैंगिक शोषण

By Admin | Updated: February 20, 2016 03:04 IST2016-02-20T03:04:20+5:302016-02-20T03:04:20+5:30

एका ४२ वर्षीय पाकिस्तानी अभिनेत्री तथा गायिकेचे लैंगिक शोषण व हिंदी चित्रपट काढण्यासाठी ३५ लाख ८० हजार रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी भोजपुरी लघुपट

Pak sexual exploitation | पाक अभिनेत्रीचे लैंगिक शोषण

पाक अभिनेत्रीचे लैंगिक शोषण

मीरा रोड : एका ४२ वर्षीय पाकिस्तानी अभिनेत्री तथा गायिकेचे लैंगिक शोषण व हिंदी चित्रपट काढण्यासाठी ३५ लाख ८० हजार रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी भोजपुरी लघुपट निर्माता व दुय्यम अभिनेता श्याम चरण यादव (३५) याला अटक केली आहे. तो जोगेश्वरीच्या बेहराम बाग येथे पत्नी आणि मुलीसह वास्तव्याला आहे.
२०१३ मध्ये भारतात ये-जा करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रीशी एका कार्यक्रमादरम्यान त्याची ओळख झाली होती. ती घटस्फोटित असून, तिला ६ मुले आहेत. दोघांनी रोड टू रिवेन्ज नावाचा एड्सवर आधारित लघुपट काढला होता. त्यानंतर यादवने तिला हिंदी चित्रपट काढण्याचे आमिष दाखवून टप्प्याटप्प्याने ३५ लाख ८० हजार रुपयांची रक्कम उकळली. तसेच शारीरिक संबंध निर्माण केले.
या प्रकरणी तिने पोलीस ठाणे गाठून गुरुवारी रात्री फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून यादवला अटक केली आहे.

Web Title: Pak sexual exploitation