खड्डय़ांवरून पनवेलमध्ये रंगतेय बॅनरबाजी

By Admin | Updated: August 7, 2014 00:55 IST2014-08-07T00:55:27+5:302014-08-07T00:55:27+5:30

ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिध्द असलेले पनवेल शहर सध्या खड्डयांची नगरी म्हणून ओळखली जात आहे.

Painted banners in Panvel from potholes | खड्डय़ांवरून पनवेलमध्ये रंगतेय बॅनरबाजी

खड्डय़ांवरून पनवेलमध्ये रंगतेय बॅनरबाजी

>पनवेल : ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिध्द असलेले पनवेल शहर सध्या खड्डयांची नगरी म्हणून ओळखली जात आहे. पावसाळयापूर्वी फक्त एक महिन्यांआधी केलेल्या पनवेलच्या रस्त्यांची संपूर्णपणो चाळण झाली असून या रस्त्यांवर वाहनधारकांप्रमाणोच पादचा:यांना देखील चालणो जिकिरीचे झाले आहे. याच मुद्दयावरून शेतकरी कामगार पक्ष व पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमध्ये सध्या बॅनर वॉर रंगल्याचे दिसून येत आहे. 
पनवेल नगरपालिकेने नुकतेच शहरातील मलनि:सारण वाहिनेचे काम पूर्ण केले. या कामानंतर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु या रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने पहिल्या पावसातचं या रस्त्यांनी कच खाल्ली आणि पनवेलच्या रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडले. सुरूवातीला पालिकेने या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली खरी परंतु त्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने या डागडुजीची देखील पोलखोल केली.
पालिकेच्या या निकृष्ट दर्जाच्या कामाचे वाभाडे काढण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने एक अभिनव कल्पना अमलात आणली. शेकापने पनवेल शहरातील तब्बल 25 रस्त्यांचे सर्वेक्षण करून प्रत्येक रस्त्याचे छायाचित्र काढले. त्यानंतर ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत नेमक्या त्याच रस्त्यावर त्या-त्या रस्त्यांच्या खड्डयांचे फोटो असलेले बॅनर लावले. या बॅनर वरील मजकूर देखील येथील रहिवाशांना आकर्षित करीत आहे. या बॅनरवर म्हटले आहे की, आलात या रस्त्यावरून? पाहिलंत काँग्रेसने कसे बहरविले आणि बदविले आहे पनवेल? चला पनवेल काँग्रेसमुक्त करूया. तर दुसरीकडे काँग्रेसने या बॅनरला उत्तर देण्यासाठी युवक काँग्रेसच्य माध्यमातून प्रभाग क्रमांक पाचमध्ये आपले देखील बॅनर झळकावून या खड्डय़ांना शेकाप जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणो आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासकामांचा पाढा वाचण्यात आला आहे.
अशा प्रकारचे बॅनर शेतकरी कामगार पक्षाने शहरातील खड्डे पडलेल्या कर्नाळा सर्कल, काँग्रेस कार्यालय, पंचर} सर्कल, तक्का रोड, मार्केट यार्ड, टपाल नाका, महात्मा गांधी रोड, पनवेल नगरपालिका, दि.बा.पाटील नगर, तहसिल कार्यालय, चिंतामणी हॉल, साईनगर, वाल्मिकी नगर, नवीन पनवेल पोलिस ठाणो, अशोक बाग, गार्डन हॉटेल, कफ नगर, सावकर चौक, गोदरेज प्लाझा, टिळक रोड, गोखले हॉल, लाईन आळी, नाडकर्णी हॉस्पिटल, गावदेवी मंदिर, रोटरी सर्कल आदि ठिकाणी लावले आहेत.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा:या पनवेल विधानसभा मतदार संघात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसमधील सत्तासंघर्ष आता पनवेलच्या खड्डय़ाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरला असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
 
रस्ते दुरूस्त करण्यासाठी पालिकेची आर्थिक अडचण होती. ती दुर करण्यासाठी आर्थिक सुसुत्रिकरण करण्याचा आमचा प्रय} आहे. त्याचबरोबर नव्याने टाकण्यात आलेल्या मल:निस्सारण वाहिन्यांमुळे करावे लागलेले रस्त्यांची काम व्यवस्थित न झाल्यामुळे आम्ही हे काम पुन्हा हाती घेऊन चांगल्या दर्जाचे रस्ते बनविण्यावर भर देणार आहोत. रस्त्यांचे नित्कृष्ट दर्जाचे काम झाले का? याची चौकशी करून नियमानुसार संबंधीत कंत्रटदारांवर कारवाई करण्यात येईल, असे पनवेल नगरपरिषदचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी सांगितले.

Web Title: Painted banners in Panvel from potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.