शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:08 IST

Meenatai Thackeray Statue News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या  मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या  मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवसैनिक आणि ठाकरे गटाचे नेते दाखल झाले. त्यानंतर पुतळ्याची स्वच्छता करून घेण्यात आली असून, अज्ञात समाज कंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुंबईतील, दादर शिवाजी पार्क परिसराममध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे. रस्त्यालगत असलेल्या या पुतळ्यावर अज्ञाताकडून लाल रंग फेकून त्याच विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ही बाब कानावर पडताच शिवसैनिक, तसेच स्थानिक खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, उपस्थित शिवसैनिकांनी पुतळ्याची स्वच्छता करून घेतली. मात्र आता शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात झाली असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

आता या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच परिसरात असलेल्या सीसीटीव्हींमधील फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक माहितीमध्ये हा प्रकार सकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या नंतर घडल्याचे समोर आले आहे. तसेच संबंधित चित्रिकरण पोलिसांच्या हाती लागले असून, आरोपीला लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.हे कृत्य करणाऱ्या भेकडांना आणि समाजकंटकांना योग्य उत्तर दिलं जाईल. या घटनेची कल्पना उद्धव ठाकरे यांना देण्यात आली असून,  ही घटना म्हणजे राज्य सरकारला आलेलं अपयश आहे. आज मुंबई सुरक्षित नाही. सरकार काय करत आहे., असा सवालही त्यांनी उपस्थित केला.   

टॅग्स :MumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे