जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे रहिवासी संतोष जगदाळे यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेला वर्ष होत आले असून, राज्य सरकारने त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या आश्वासनाची पूर्तता न झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री अनुकूल असूनही फाईल रखडली?
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, "संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला, आसावरी यांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा खुद्द सरकारनेच केली होती. स्वतः मुख्यमंत्री यासाठी अनुकूल होते. तरीही अद्याप आसावरी यांना नोकरी का मिळत नाही, याचे सखेद आश्चर्य वाटते."
आसावरी जगदाळे यांची योग्यता आणि सद्यस्थिती
आसावरी जगदाळे या केवळ उच्चशिक्षितच नसून, त्यांना कामाचा पुरेसा अनुभवदेखील आहे. त्यांच्या पात्रतेनुसार उचित नोकरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे हा प्रस्ताव अद्यापही लाल फितीत अडकल्याचे चित्र आहे.
जगदाळे कुटुंबापुढे संकटांचा डोंगर!
पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळे यांच्या निधनामुळे कुटुंबाचा मुख्य आधार हरपला आहे. या कुटुंबाकडे उत्पन्नाचे साधन नसल्याने कुटुंब सध्या मोठ्या आर्थिक आणि मानसिक संघर्षातून जात आहे. सरकारी आश्वासनानंतरही गेल्या अनेक महिन्यांपासून हे कुटुंब केवळ आश्वासनांच्या पूर्ततेची वाट पाहत आहे.
संवेदनशीलतेची अपेक्षा
"पहलगाम हल्ल्यात आपल्या देशासाठी जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती सरकारने किमान संवेदनशीलता दाखवायला हवी," अशा शब्दांत सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. आसावरी यांच्या नोकरीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही विनंती त्यांनी राज्य सरकारला केली आहे.
निष्पाप पर्यटकांवर झालेला गोळीबार
२२ एप्रिल २०२५ रोजी झालेला पहलगाम हल्ला हा भारतीय प्रशासित काश्मीरमधील पहलगाममध्ये झाला होता. तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला हल्ल्यात २६ नागरिक ठार झाले.
Web Summary : Supriya Sule criticizes the government for failing to provide a promised job to Asavari Jagdale, daughter of a Pahalgam attack victim, despite the CM's support. The family faces financial hardship, awaiting fulfillment of the government's assurance.
Web Summary : सुप्रिया सुले ने पहलगाम हमले के पीड़ित की बेटी, आसावरी जगदाले को नौकरी देने में सरकार की विफलता की आलोचना की। मुख्यमंत्री के समर्थन के बावजूद वादा पूरा नहीं हुआ। परिवार आर्थिक संकट का सामना कर रहा है।