अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कायद्याची भीती उरलेली नाही. त्यामुळे अशा भेसळखोरांवर कायदेशीर कारवाई करतानाच त्यांचे फोटो वर्तमानपत्रात छापून त्यांचे काळे कारनामे लोकांपर्यंत आणा. ...
जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुतर्फा मोठया प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या कारंजा घाडगे शहराकरिता उड्डाणपूल निर्मिती कार्याला गती द्यावी व अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या असलेला विषय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्याने सोडवावा ... ...
विदर्भात अकोल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील निजामपूर गावात सुरेश भांगे या शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडअळी आढळल्याने कृषी विभाग हादरून गेला आहे. ...
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तळेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने केलेली नाला खोलीकरण कामे यशस्वी ठरली आहे. या नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी सोय झाली आहे. ...
वर्धेच्या मगन संग्रहालय समितीने पारंपारिक मूल्य संवर्धनासाठी गिरड गावात उभारलेले नैसर्गिक शेती विकास केंद्र शेकडो गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. ...
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात आठ कोटी रुपये निव्वळ नफा झाला. संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश दिला जाईल, अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी मुकुटबन येथे झालेल्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. ...
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सेवानिवृत्त अभियंत्यांनी मदतीचा हात दिला आहे. गरजू ५५ विद्यार्थिनींना शनिवारी शिष्यवृत्तीच्या रूपाने पावणे दोन लाखांची मदत वितरित करण्यात आली. ...
स्थानिक विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मंडीत एका टीनाच्या शेडखाली बसलेल्या दोघांना गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याजवळून देशी कट्टा व एक काडतुस जप्त करण्यात आले. ...
शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना विषबाधेचे बळी ठरत आहे. तरीही अळी रोखणारे फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मागील वर्षी २१ शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. ...