शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पादुका सार्इंच्या, विश्वभ्रमंती विश्वस्त,अधिका-यांची; दौरा थांबविण्यासाठी साईभक्त उपोषण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 20:01 IST

प्रमोद आहेरशिर्डी : देशभर प्रसिद्ध असूनही शिर्डीतील आगमनानंतर साईबाबांनी आपल्या हयातीत कधी पंचक्रोशीच्या सीमा ओलांडल्या नाहीत. त्यांच्या समाधी शताब्दीच्या नावाखाली त्यांच्या पादुकांच्या रूपाने संस्थान त्यांना विश्वभ्रमंतीला घेऊन निघाले आहे.जगभरातील करोडो भाविकांच्या हृदयात कोणत्याही प्रयत्नांशिवाय जगभरात पोहचलेल्या साईबाबांचा प्रचार ही अफलातून कल्पना आहे. ‘माझा माणूस जगात कोठेही असला तरी चिमणीच्या पायाला दोर बांधून ...

प्रमोद आहेरशिर्डी : देशभर प्रसिद्ध असूनही शिर्डीतील आगमनानंतर साईबाबांनी आपल्या हयातीत कधी पंचक्रोशीच्या सीमा ओलांडल्या नाहीत. त्यांच्या समाधी शताब्दीच्या नावाखाली त्यांच्या पादुकांच्या रूपाने संस्थान त्यांना विश्वभ्रमंतीला घेऊन निघाले आहे.जगभरातील करोडो भाविकांच्या हृदयात कोणत्याही प्रयत्नांशिवाय जगभरात पोहचलेल्या साईबाबांचा प्रचार ही अफलातून कल्पना आहे. ‘माझा माणूस जगात कोठेही असला तरी चिमणीच्या पायाला दोर बांधून ओढतात तसे मी त्याला शिर्डीला ओढून आणीन’ असे साईबाबा नेहमी म्हणत. त्यांच्या या वचनालाच संस्थानच्या कृतीतूनच हरताळ फासला गेला आहे. विजयादशमीनंतर गोव्यापासून या दौ-याची सुरूवात झाली. राज्याचे सर्व जिल्हे, प्रत्येक राज्याच्या राजधान्या, महत्त्वाची शहरे तसेच पंचवीस देशात या पादुका नेण्यात येणार आहेत. यानिमित्त संस्थानचे पदाधिकारी व अधिका-यांवर देश-विदेशात भ्रमंती करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.जेथे साई अगोदरच पोहचले तेथेच या पादुका जाणार आहेत. ‘माझ्या समाधी नंतर शिर्डीत मुंग्यासारखी गर्दी होईल’ असे बाबा म्हणत. याची नित्य प्रचितीही येते आहे. समाधी शताब्दी वर्षात या गर्दीचा उच्चांक होईल, असे वाटत असतांनाच साईपादुकांची वर्षभर विश्वभ्रमंती सुरू झाली आहे. जगभरातील लोक ज्याच्या दारी दर्शनासाठी तिष्ठत आहेत, त्यालाच आता घरोघरी फिरविले जाणार आहे़ यामुळे ‘भाविक साईदरबारी नव्हे तर साईच आपल्या दारी’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शताब्दीत शिर्डीतील गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता मावळली आहे. याशिवाय दौ-यात काही ठिकाणी आयोजक व्यावसायिकदृष्ट्या बघत असल्याची चर्चा आहे. सुरूवातीला दौ-याचे समर्थन करणा-या शिर्डीकरांमध्येही अस्वस्थता पसरत आहे.बाबांच्या हयातीतील त्यांचे परमभक्त तात्या कोते व बायजाबाई कोते यांचे वंशज सर्जेराव कोते यांनी पादुकांच्या अमेरिका दौ-यावर आक्षेप घेत द्वारकामाई समोर उपोषणाचा इशारा दिला आहे. तर तुकाराम गोंदकर यांनी ग्रामस्थांना पादुका भ्रमंतीबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. शताब्दीत अशा निष्फळ प्रचाराची नाही तर शिर्डीत आलेल्या भाविकांचे दर्शन व वास्तव्य आनंददायी कसे होईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने ते सोडून ‘चमको व घुमकोगिरी’ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Ahmadnagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा