‘हायवे ट्रॅफिक’च्या प्रमुखपदी पद्मनाभन
By Admin | Updated: September 2, 2016 01:20 IST2016-09-02T01:20:00+5:302016-09-02T01:20:00+5:30
एक, दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे बदली, बढती करण्याची गृहविभागाची प्रक्रिया कायम राहिली असून, विशेष पोलीस महानिरीक्षक आर. के. पद्मनाभन

‘हायवे ट्रॅफिक’च्या प्रमुखपदी पद्मनाभन
मुंबई : एक, दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे बदली, बढती करण्याची गृहविभागाची प्रक्रिया कायम राहिली असून, विशेष पोलीस महानिरीक्षक आर. के. पद्मनाभन यांना अप्पर महासंचालक म्हणून बढती देत, महामार्ग वाहतूक नियंत्रण विभागाच्या (हायवे ट्रफिक) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
गेल्या आठ दिवसांत राज्य सरकारने सात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार बढती, बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक, नागपूरच्या आयुक्तांचा समावेश आहे. आर. के. पद्मनाभन हे १९९२च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर ‘सेबी’मध्ये कार्यरत होते. त्या पूर्वी म्हाडा व २००९-१० मध्ये त्यांनी दक्षिण मुंबईचे अप्पर आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. (प्रतिनिधी)