शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

२५ साखर कारखाने उभारणार ऑक्सिजन प्रकल्प,  उस्मानाबादमधून उद्यापासून निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 05:00 IST

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढत असताना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता होत नसल्याचे दिसत आहे.

चंद्रकांत कित्तुरे -                                                                                                                                               कोल्हापूर : कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची संजीवनी देण्याचा निर्णय राज्यातील सुमारे २५ साखर कारखान्यांनी घेतला आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असून, ६०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आयात करण्यात येत आहे. देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढत असताना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता होत नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याचे आदेश दिले होते.

३ प्रकारे ऑक्सिजननिर्मिती- सध्याच्या इथेनॉल प्रकल्पात सुधारणा  करून ऑक्सिजन निर्मिती, स्किड माऊंटेड ऑक्सिजन प्लांट उभारणे, कान्सन्ट्रेटरची आयात करणे, यावर भर दिला होता. - दुसरा व तिसरा पर्याय बहुंताश कारखान्यांनी स्वीकारला. उस्मानाबादच्या धाराशीव साखर कारखान्याने पहिला पर्याय स्वीकारून इथेनॉल प्रकल्पात आवश्यक सुधारणा केल्या. यातून १३ मे रोजी ऑक्सिजननिर्मिती सुरू होणार आहे.- बारामती ॲग्रो युनिट १, उस्मानाबाद येथील नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रिज लिमिटेड, कोल्हापुरातील दत्त दालमिया कारखान्यातून मे अखेर किंवा जूनमध्ये गॅसनिर्मिती सुरू होईल.

दररोज १०० सिलिंडरचे उत्पादन -स्किड माउंटेड प्लांटचा उभारणी खर्च सुमारे ५० लाख रुपये आहे. त्याची क्षमता २५ ते ३० घनमीटर प्रति तास असून, दररोज ९० ते १०० ऑक्सिजन सिलिंडर भरले जातील. जवळपासच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांना माफक दरात ते पुरविले जातील.

प्रत्येक साखर कारखान्याने किमान एक ऑक्सिजन प्लांट आणि २५ कॉन्सन्ट्रेटर खरेदी करून कोरोना रुग्णांना संजीवनी द्यावी.    - बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, विस्मा

कोरोना महामारीनंतरही हे प्रकल्प  उत्पन्नाचा एक अतिरिक्त स्रोत म्हणून कार्यरत राहतील. कारखान्याची गरज भागवून उर्वरित ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी पुरवता येईल.    - संजय खताळ, व्यवस्थापकीय     संचालक, राज्य सहकारी साखर     कारखाना महासंघ. 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSharad Pawarशरद पवार