पाच लाखात घर देणा-या मॅपलच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड
By Admin | Updated: April 19, 2016 15:23 IST2016-04-19T15:23:57+5:302016-04-19T15:23:57+5:30
पुण्यात पाच लाखात घर देण्याचा दावा करणा-या मॅपल बिल्डर्सच्या कार्यालयात घुसून मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.

पाच लाखात घर देणा-या मॅपलच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ - पुण्यात पाच लाखात घर देण्याचा दावा करणा-या मॅपल बिल्डर्सच्या कार्यालयात घुसून मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. शिवाजीनगर येथील मॅपल बिल्डर्सच्या कार्यालयाबाहेर मनसैनिकांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर घरासाठींचे बुकिंग थांबवण्यात आले आहे.
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पाच लाखात घर देण्याची जाहीरात मॅपल ग्रुपने केली होती. या जाहीरातील पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे वापरण्यात आली होती. या छायाचित्रांवरुन सरकारी योजना असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर मुंबईतील भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी रीतसर तक्रार दाखल केली.
सरकारनेही आपला या योजनेशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केला. त्यानंतर या कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले. पण अद्यापही या कपंनीच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही.