ओव्हरहेड वायर तुटल्याने म.रे.विस्कळीत, प्रवाशांचे हाल
By Admin | Updated: September 2, 2014 09:47 IST2014-09-02T09:26:14+5:302014-09-02T09:47:43+5:30
मध्य रेल्वेच्या मुंबईच्या दिशेने जाणा-या लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने मंगळवारी सकाळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत

ओव्हरहेड वायर तुटल्याने म.रे.विस्कळीत, प्रवाशांचे हाल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - मध्य रेल्वेच्या मुंबईच्या दिशेने जाणा-या लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने मंगळवारी सकाळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. घाटकोपर स्टेशनजवळ स्लो ट्रॅकवरील लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने स्लो ट्रॅक ठप्प झाला व त्यामुळे स्लो ट्रॅकवरील गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्या. परिणामी गाड्या ३०-४० मिनिटे उशीराने धावत असून गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. बिघाड दुरूस्ती होईपर्यंत लोकल नाहूर व कांजुरमार्ग स्टेशनवर थांबणार नसल्याची घोषणा रेल्वे स्टेशनवर करण्यात येत आहे. तसेच प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहनही रेल्वेतर्फे करण्यात येत आहे.
दरम्यान ओव्हरडेह वायर दुरूस्तीचे काम सुरू असून येत्या दोन तासांत ते पूर्ण होऊन वाहतूक पूर्वपदावर येईल असे समजते.