शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘भर पावसात दुश्मनी गेली वाहूऩ़़ भगव्या छत्रीखाली नवी मैत्री आली धावून’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 13:13 IST

माळशिरस तालुक्यात एकत्र वृक्षारोपण

ठळक मुद्देमाळशिरस तालुक्यातील दोन कट्टर विरोधी गटातील नेतेमंडळी एका व्यासपीठावर दिसू लागली आहेत‘भर पावसात दुश्मनी गेली वाहूऩ़़ भगव्या छत्रीखाली नवी मैत्री आली धावून’

एल. डी. वाघमोडे 

माळशिरस : माळशिरस तालुक्यातील दोन कट्टर विरोधी गटातील नेतेमंडळी एका व्यासपीठावर दिसू लागली आहेत. नुकत्याच निमगाव झेडपी गटात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी खा़ विजयसिंह मोहिते-पाटील व भाजपमधील जुने कार्यकर्ते के़ के़ पाटील यांच्यासह दोन्ही गटाच्या नेतेमंडळींनी भर पावसात भिजत वृक्षारोपण केले. यावरून ‘भर पावसात दुश्मनी गेली वाहूऩ़़ भगव्या छत्रीखाली नवी मैत्री आली धावून’ असेच काहीसे चित्र पाहावयास मिळाले.

झेडपी गट व पंचायत समिती गणात अटीतटीच्या लढती लागत होत्या, त्यावेळी ही नेतेमंडळी एकमेकांविरोधात होती. आता हे नेते पावसात भिजत एका व्यासपीठावर दिसली. वरिष्ठ स्तरावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आमचं अन् मोहिते-पाटील यांचं ठरलंय पण तालुक्यात या दोन्ही गटाच्या नेतेमंडळींचं झेडपी, पंचायतीचं काय ठरलंय असा प्रश्न आता कार्यकर्ते विचारू लागले आहेत त्यातच दर अडीच वर्षांनंतर होणारी सभापती, उपसभापती पदाची निवड काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सध्या तरी वनमहोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा दोन्ही गटांनी एकत्र येत वृक्षलागवड केली.

तालुक्यातील मोहिते-पाटील  गट व विरोधी गट यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीपासून राजकीय जादू घडली. दोन्ही गटातील नेते धुसफूस करीत का होईना, पण एका व्यासपीठावर दिसू लागले आहेत. निमगाव झेडपी गटात यापूर्वी अनेक निवडणुकांत के. के. पाटील व मोहिते-पाटील समर्थक अशीच लढत होत होती़ विरोधी गटाचे मास्टर मार्इंड के. के़ पाटील व व माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील हे एका व्यासपीठावर दिसले नव्हते. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम कायम होता.गोरडवाडी (ता. माळशिरस) येथे वृक्षलागवड सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात दोन्ही गटांची नेतेमंडळी मांडीला मांडी लावून बसली होती़ कार्यक्रम सुरू होताच रिमझिम पावसालाही सुरुवात झाली़ त्यानंतर या दोन्ही नेतेमंडळींनी वृक्षारोपण केले़ त्यामुळे तालुक्यात याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण