नद्याजोड प्रकल्पातून दुष्काळावर मात
By Admin | Updated: November 23, 2014 01:53 IST2014-11-23T01:53:23+5:302014-11-23T01:53:23+5:30
महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाला 2क् हजार कोटी रुपये खर्चाचा नद्याजोड प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल दिला आहे.

नद्याजोड प्रकल्पातून दुष्काळावर मात
अहवाल केंद्राला सादर : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची माहिती
लातूर : महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाला 2क् हजार कोटी रुपये खर्चाचा नद्याजोड प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल दिला आहे. या माध्यमातून मराठवाडय़ाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 70 टक्के भाग सिंचनाखाली येऊन दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
खडसे म्हणाले की, दुष्काळी स्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज्यात सिंचन सुविधांवर जोर देण्यात येईल. याअंतर्गत केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याबरोबर प्रत्येक राज्याच्या मंत्र्यांची बैठक झाली. यात अप्पर नद्याजोड प्रकल्पांतर्गत राज्याच्या कानाकोप:यांनी पाणी नेण्याच्या प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाने यानंतर अप्पर घाट ते गोदावरी खोरे, अप्पर वैतर्णा ते गोदावरी खोरे आणि उत्तर कोकण ते गोदावरी खोरे या तीन योजनेचा 2क् हजार कोटीचा प्रायमरी प्रोजेक्ट रिपोर्ट केंद्र शासनाकडे सादर केला आहे. याला मंजुरी मिळाल्यास टी. एम. सी. साठी भांडणा:या मराठवाडय़ाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 7क् टक्के क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. (प्रतिनिधी)
नरेगातील खर्चाचे बदल मजुरांच्या फायद्याचे..
नरेगाअंतर्गत 6क् टक्के मजुरीवर आणि 4क् टक्के यांत्रिकीकरणावर होणारा खर्च यापुढे 51 टक्के मजुरी आणि 49 टक्के यांत्रिकीकरणावर खर्च करण्याच्या निर्णयाचे महसूलमंत्र्यांनी समर्थन केले. यामुळे मजुरांना गावातच काम करण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
खडसेंच्या दौ:यादिनीच दोन आत्महत्या
च्देवणी/ औसा : महसूलमंत्री एकनाथ खडसे दौ:यावर असतानाच शनिवारी पहाटे लातूर जिलतील देवणी व औसा तालुक्याच्या दोन शेतक:यांनी दुष्काळी परिस्थितीत कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. एकाने विष प्राशन करून तर दुस:याने गळफास घेऊन आपली जीवनयात्र संपविली.
च्बालाजी किसन बिरादार (5क्, रा़ कोनाळी नागराळ, ता़ देवणी) आणि महादेव व्यंकट करडे (35, रा़ हासेगाववाडी, ता़ औसा) अशी या शेतक:यांची नावे आहेत. देवणी तालुक्यातील कोनाळी (नागराळ) येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी बिरादार चार एकर कोरडवाहू शेतावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत़ दोन वर्षापासून निसर्गाची अवकृपा झाल्याने कुटूंब चालविण्यासाठी ते मजूरीसाठी जात होते.
च्यंदा तर शेतात काहीच हाती लागले नाही. अशा परिस्थिती अडकलेल्या बिरादार यांची पत्नी काही दिवसांपूर्वी दोन्ही डोळ्यांनी अंध झाली होती़ तसेच घरी आई- वडिल वृध्द असल्याने पत्नीसह आई- वडिलांचा ते सांभाळ करीत़ सहकारी बँकेचे 25 हजारांचे कर्ज आणि काही खासगी कर्ज असल्याने आर्थिक भार उचलणो कठीण झाले होत़े या विवंचनेतून त्यांनी शनिवारी पहाटे राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली़
च्दुसरी घटना औसा तालुक्यातील हासेगाववाडी येथे शनिवारी सकाळी घडली़ येथील महादेव व्यंकट करडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्यावर एका राष्ट्रीयकृत बँकेचे 25 हजाराचे कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितल़े