पंढरपूरवारीसाठी नाशिकवरून ४०० हून अधिक सायकलिस्ट रवाना
By Admin | Updated: July 8, 2016 13:18 IST2016-07-08T13:17:36+5:302016-07-08T13:18:06+5:30
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित 'पंढरपूर सायकल वारी' साठी ४०० हुन अधिक सायकलिस्ट शुक्रवारी रवाना झा

पंढरपूरवारीसाठी नाशिकवरून ४०० हून अधिक सायकलिस्ट रवाना
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ८ - नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित 'पंढरपूर सायकल वारी' साठी ४०० हुन अधिक सायकलिस्ट शुक्रवार (दि.८) नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून रवाना झाले.
१२ ते ६५ वयोगटातील सायकलिस्ट यात सहभागी झाले आहेत. पंढरपूर सायकल रॅलीचे यंदाचे पाचवे वर्ष असून नाशिक - सिन्नर- संगमनेर- राहुरी - अहमदनगर - करमाळा- टेंभुर्णी मार्गे पंढरपूर अशा तीन दिवसात ही रॅली संपन्न होणार आहे.
दरम्यान शुक्रवारी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांनी रॅली ला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वाहनांऐवजी सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचा संदेश रॅलीतुन दिला जाणार आहे.
यावेळी आमदार सीमा हिरे, हरिष बैजल, नगरसेवक तानाजी जायभावे यांच्यासह नाशिक सायकलिस्टचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.